
कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालानं आपल्या सौंदर्य आणि धैर्यानं लोकांच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तिनं पती पराग त्यागीबरोबर स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री दिसतेय.

शेफाली जरीवाला सध्या पराग त्यागीसोबत घालवलेले रोमँटिक क्षण आठवतेय.

या फोटोंमध्ये शेफाली आपल्या पतीबरोबर स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये शेफाली जरीवाला आणि नवरा पराग त्यागी एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. शेफालीने बॉयफ्रेंड पराग त्यागीसोबत ऑगस्ट 2014 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं.

शेफालीचं हे दुसरं लग्न होतं. शेफालीचं पहिलं लग्न गायक हरमीत गुलझार यांच्याशी झालं होतं, मात्र 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. शेफालीने स्वतः घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं.