
14 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ: चाप्टर 2' (KGF Chapter 2) या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. या चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आकडा हा 1000 कोटींकडे पोहोचतोय. आतापर्यंत या चित्रपटाने 926 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आतापर्यंत 'दंगल', 'बाहुबली: द कन्क्लुजन' आणि 'RRR' या तीन चित्रपटांनी जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. केजीएफ 2 हा यादीतला चौथा चित्रपट ठरेल. 'केजीएफ 2'चा हिंदी व्हर्जन आता आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 'दंगल'चा विक्रम मोडू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला आहे. 'केजीएफ 2'च्या हिंदी व्हर्जनची कमाई ही 336.88 कोटी रुपये इतकी झाली.

'दंगल'ने भारतात 387 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत आमिर खानच्या 'दंगल'ला मागे टाकत केजीएफ 2 दणक्यात कमाई करेल, असं म्हटलं जातंय.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.