
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) तिच्या आश्चर्यकारक फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मग तो कोणताही कार्यक्रम असो, चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा अगदी एअरपोर्ट लूक. तिच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल ती अनेकदा चर्चेत असते.

कियारा अनेकदा तिच्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री टाय-डाय प्रिंटेड ब्रालेट आणि पॅंट परिधान केलेली दिसत आहे.

आजकाल टाय-डाय लूक खूप ट्रेंडमध्ये आहे. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, आलिया भट्टसह अनेक अभिनेत्री टाय-डाय लूकमध्ये दिसल्या होत्या. या प्रिंटेड पोशाखात कियारा जबरदस्त आकर्षक दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक किलर फोटो पोज दिल्या आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा आहे.

कियारा हिने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे प्रिंटेड ब्रालेट परिधान केले आहे, ज्यात तिने एक क्रॉप टॉप लूक कॅरी केला आहे जो एक व्ही- नेकलाइन लूक देत आहे. अभिनेत्रीने ब्रालेटसह हायवेस्ट पॅंट परिधान केली आहे.

या लूकसह कियाराने सोनेरी नेकलेस, हुप इअररिंग आणि बोटात अंगठ्या परिधान केल्या आहेत. यासह तिने हलका मेक-अप केला आणि आउटफिटशी मिळती-जुळती न्यूड शेड लिपस्टिक लावली होती.