
बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या या नव्या सिझनमध्ये कोण- कोण असणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यातच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर या शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा होतेय.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात 'कोकण हार्टेड गर्ल' बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

बिग बॉसबाबत अपडेट देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

अंकिता प्रभू वालावलकर सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या पोस्टवरही कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल विचारलं आहे. बिग बॉसमध्ये जाणार आहेस का? तुला तिथं पाहायला आवडेल, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

'कोकण हार्टेड गर्ल' बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र बिग बॉस आणि अंकिता प्रभू वालावलकरने याबाबत कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही. त्यामुळे 28 जुलैला बिग बॉसचा पहिला एपिसोड प्रसारित होईपर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागेल.