
नुकतंच, 'तुफान' चित्रपटातील अभिनेत्री मृणाल ठाकूरने एक फोटोशूट केलं आहे ज्यात ती अगदी वेगळ्या अवतारात दिसली.

या फोटोत मृणाल लेडी बॉसच्या लूकमध्ये दिसत आहे. मृणालनं यावेळी ब्लॅक ब्रॅलेट टॉप आणि क्विर्की डेनिम जीन्स परिधान केली आहे, ज्यात ती किलर स्टायलिश लुकमध्ये दिसत आहे.

या लूकसाठी मृणालनं या ड्रेसवर ब्लॅक ब्लेझर कॅरी केला आहे. जो या लूकला परिपूर्ण करतोय.

मृणालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.

मृणालने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सिल्व्हर हूप कानातले आणि घड्याळ घातले होते.

मृणाल ठाकूरचं हे ब्रलेट टॉप आणि डेनिम जीन्स भारतीय फॅशन लेबल मॅडिसनचे आहेत. ब्लेझर भारतीय फॅशन लेबल मेलोड्रामाचे आहे. मृणालच्या या ब्लॅक ब्लेझरची किंमत डिझायनरच्या वेबसाइटवर 9,800 रुपये आहे.