
बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले, त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अभिनेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी शेकडोंची गर्दी जमली होती.

दिलीपकुमार यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेले होते. जुहू कब्रस्तानात चाहते त्यांच्या लाडक्या कलाकाराला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते.

अभिनेत्याच्या अंत्यसंस्कारांमध्ये पत्नी सायरा बानो स्वत: हजर होत्या. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईही त्यांच्यासोबत दिसले.

अनिल कपूर, शाहरुख खान, रणबीर कपूर, विद्या बालन सारख्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या लाडक्या स्टारच्या शेवटच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.

दिलीपकुमार यांच्या निधनानंतर चाहते आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सायरा बानो यांनी आज आपल्या जोडीदाराला कायमचे गमावले आहे. यावेळी त्यांचे दु:ख स्पष्टपणे दिसून येत आहे.