
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मीराची फॅन फॉलोइंग एका टॉप अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतो. लाखो लोक त्याला फॉलो करतात. मीरानं आता तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

मीरानं स्वत:चे हे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती वेगवेगळे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. पहिला फोटो शेअर करताना मीरानं लिहिलं की जपानी कोटनुसार तुमचे तीन चेहरे असतात. एक जो तुम्ही जगाला दाखवता.

दुसरा फोटो शेअर करत मीरानं एक नवं कॅप्शन दिलं आहे. तिनं लिहिलं – दुसरा चेहरा जो तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना दाखवता.

शेवटचा फोटो शेअर करताना मीरानं लिहिलं - तिसरा चेहरा, जो तुम्ही कोणालाच दाखवत नाही. तुम्ही कोण आहात हे याचं खरं प्रतिबिंब असतं.

सेलेब्सही मीराच्या या फोटोंवर कमेंट्स करत आहेत. कियारा आडवाणीनं कमेंट केली आहे – ‘उफ्फ...’ आणि फायर इमोजी देखील तिनं पोस्ट केली आहे. ती या लूकमध्ये मीरा कमालीची सुंदर दिसतेय.