
भोजपुरी क्वीन मोनालिसा आपल्या स्टाईलने सर्वांची मनं जिंकत असते. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. तिचे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. यावेळी मोनालिसाने पारंपारिक अवताराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

ग्लॅमरस अवतार गाजवणाऱ्या मोनालिसाने तिचा साधा लूक चाहत्यांना दाखवला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

मोनालिसाने येल्लो साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत. मोनालिसाचा साधा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हजारो लोकांनी तिचे फोटो पसंत केले आहेत.

चाहते मोनालिसाच्या फोटोंवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. एका चाहत्याने लिहिले - माझी क्रश. तर दुसऱ्याने लिहिले - खूप सुंदर मॅडम.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मोनालिसा रात्रि के यात्री या वेब सीरिजच्या सीझन 2 मध्ये दिसणार आहे. तिने आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती.