
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. तिने आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी रॉय तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करते. आता तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मोनीचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयच्या बीच व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्री मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. तिथून ती सतत चाहत्यांना अपडेट देत आहे.

अभिनेत्री मौनी रॉयनं पुन्हा एकदा तिच्या कर्व्ह बॉडीची झलक दाखवली आहे. तिनं तिच्या बिकिनी ड्रेसमधील फोटोत ग्लॅमरस स्टाईल दाखवली आहे.

सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.

मौनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.