
अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांआधी लग्नगाठ बांधली...आधी घट्ट मित्र असणाऱ्या तितीक्षा आणि सिद्धार्थ विवाह बंधनात अडकले.

यंदाचा गुढीपाडवा तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नानंतरचा हा पहिला सण आहे... त्यामुळे यंदाचा हा गुढीपाडवा हा या दोघांसाठी खास आहे. यासाठी दोघांनी खास प्लॅनिंगही केलं आहे.

गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे माझा मी खास सुट्टी घेतली आहे, असं तितीक्षाने सांगितलं.

गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे. माझं सासर नाशिक आहे. माझे सासू-सासरे नाशिकला असतात आणि आम्ही मुंबईमध्ये असतो. सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊ आणि सुंदरशी गुडी उभारू, गोड खाऊ, सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवू, असं तितीक्षा म्हणाली.

'तू अशी जवळी राहा' या मालिकेत तितिक्षा आणि सिद्धार्थने एकत्र काम केलं. त्यानंतर या दोघांची मैत्री फुलत गेली अन् दोघे प्रेमात पडले. नुकतंच या दोघांनी लग्न केलं आहे.