
सिनेमागृह ते सोशल मीडिया.. सध्या चर्चा आहे ती म्हणजे नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटाचीच. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे पडद्यामागील काही फोटो समोर आले आहेत.

'बोलकी फ्रेम' या फेसबुक पेजवर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

चित्रपटात भावना भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली पाटील..

सेटवर सीन समजावून सांगताना नागराज मंजुळे..

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.

चित्रपटातील दृश्याबाबत चर्चा करताना बिग बी आणि नागराज मंजुळे..

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

या चित्रपटाने पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर 9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'झुंड'च्या सेटवरील अमिताभ बच्चन..

सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यांनी कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपले आहेत.