
'बिग बॉस 14' फेम निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. निक्की तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकतंच निक्कीनं तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत, हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहते मजेदार कमेंट्स सुद्धा करत आहेत.

निक्की तांबोळीने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये निक्की अप्रतिम दिसत आहे. चाहत्यांनाही निक्कीचा हा लूक आवडला आहे.

पोस्ट करत निक्की तांबोळीनं एक मजेदार कॅप्शन दिलं आहे. निक्कीनं लिहिलं की, 'तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात शांतता नाही.'

यापूर्वी निक्की तांबोळीनं अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट केले होते ज्यात ती जांभळ्या रंगाचा स्कर्ट- क्रॉप टॉप परिधान करुन दिसली होती. निक्कीचा प्रत्येक लूक बर्यापैकी ग्लॅमरस आहे.