
बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला नुकतंच स्पॉट करण्यात आलं. तिच्या या नव्या लूकमध्ये ती कमालीची हॉट दिसत होती.

या वेळी तिने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. तिनं तिचा हा ड्रेस पांढऱ्या हिल्स सोबत कॅरी केला होता आणि केस तिनं खुले सोडले होते.

व्हाईट बॉडीकॉन ड्रेस आणि हाय हिल्समध्ये नोरानं चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

नोरा नुकतंच अजय देवगण स्टारर ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये दिसली होती हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार वर रिलीज झाला होता.

ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे आणि तिचे प्रचंड चाहते आहेत. केवळ एकट्या इन्स्टाग्रामवर तिचे 31.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 'दिलबर' या गाण्याच्या माध्यमातून तिनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.