
नोरा फतेही तिच्या किलर डान्स मूव्ह्सने चाहत्यांना प्रभावित करते. नुकतंच नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नोरा खूप सुंदर दिसत आहे. सहसा नोरा वेस्टर्न आणि बॉडी कॉन ड्रेसेसमध्ये दिसते. या देसी स्टाईलमध्ये ती तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

नोराने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तिनं या साडीसोबत स्ट्रॅपी ब्लाउज कॅरी केलं आहे. याआधीही नोरा देसी लूकमध्ये दिसली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर आकांक्षा गजारियानं ही साडी डिझाईन केली आहे.

नोराने ब्लिंगी पॅटर्न असलेली शिफॉन साडी परिधान केली आहे. साडीचा लखलखीत लूक तिच्या स्टाईल स्टेटमेंट बरोबर जातोय.

नोराने तिच्या साडीसोबत मॅचिंग कलर कॉम्बिनेशनचं ब्लाउज कॅरी केलं आहे.

नेहमीप्रमाणे, नोरा न्यूड मेकअप आणि पिंक लिपस्टिकमध्ये दिसतेय.