Palak Tiwari | अशी होती पलक तिवारी आणि सलमान खान यांची पहिली भेट, अभिनेत्री म्हणाली, आयुष्यातील सर्वात चांगली गळाभेट…

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक हिचे नाव सैफ अली खान याच्या मुलासोबत जोडले जात आहे.

| Updated on: Apr 21, 2023 | 8:06 PM
1 / 5
किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

2 / 5

श्वेता तिवारी हिने मुलीच्या बाॅलिवूड पदार्पणसाठी खूप जास्त मेहनत घेतलीये. सलमान खान याने पलक तिवारी हिला त्याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिलीये. श्वेता तिवारी आणि सलमान खान यांचे खास रिलेशन आहे.

3 / 5

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने सलमान खान याच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. बिग बाॅसच्या सेटवर पलक हिची पहिली भेट सलमान खान याच्यासोबत झाली होती.

4 / 5

सलमान खान याला ज्यावेळी पहिल्यांदा पलक भेटली होती, त्यावेळी ती 8 वर्षांची होती. पलकने सांगितले की, तेव्हापासून आजपर्यंत सलमान खान हा एकमेव व्यक्ती आहे ज्याने तिला तिच्या आयुष्यातील सर्वात चांगली गळाभेट दिली.

5 / 5

पलक तिवारी हिचे नाव सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत जोडले जात आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा आहेत. यावर पलक हिने मोठा खुलासा केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us