
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनं जॅकलिन फर्नांडिससोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे.

या फोटोत अर्जुन कपूरनं पांढरा शर्ट आणि काळा कोट परिधान केला आहे. त्याचबरोबर जॅकलीननं पांढरा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

जॅकलीन आणि अर्जुन हे ‘भूत पोलीस’ या चित्रपटात झळकणार आहेत आणि नुकतंच या चित्रपटाचं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

अर्जुन आणि जॅकलिन या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या चित्रपटाशिवाय अर्जुन कपूर एक व्हिलन रिटर्न्समध्येही दिसणार आहे.