
निया शर्मा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या टीव्ही स्टार्सपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत मजेदार रील, व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते, अनेकदा ती तिच्या सेक्सी फिगरची झलक दाखवते.

आता पुन्हा एकदा नियानं तिच्या चाहत्यांना बोल्ड फोटोंनी आश्चर्यचकित केलं आहे. गोल्डन ड्रेसमधील तिची स्टाईल खूप किलर आहे.

या फोटोमध्ये प्रत्येकाच्या नजरा निया शर्माच्या अतिशय सुंदर ड्रेसवर खिळलेल्या आहेत. तिने गोल्डन शिमरी बोल्ड गाऊन घातला आहे, जो उच्च थाई स्लिट पॅटर्नमध्ये आहे. या हाय स्लिट गाऊनमध्ये नियाचे टोन्ड पाय लक्ष वेधून घेत आहेत.

या अत्यंत स्टायलिश डीप नेक ड्रेसमध्ये निया खूप सुंदर दिसत आहे. तिनं तिचा लुक वेब हेअरस्टाईलसह पूर्ण केला.

या शूटमध्ये निया सोफ्यावर पोज देत आहे, तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते वेडे झाले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर निया शेवटी 'अखियां गा घर' या पंजाबी गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. नियानं रोहित शेट्टीने होस्ट केलेला 'खतरों के खिलाडी' हा साहसी रिअॅलिटी शोही जिंकला आहे.