Raigad Student Name : रायगडला सहलीसाठी गेले, समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, नावे समोर
ही घटना घडल्यानंतर रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या आणि मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी घटनेची माहिती दिली. ही घटना घडल्यानंतर मी तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. या दुर्घटनेत बचावलेल्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार करा, असे निर्देश मी दिले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

Raigad Sea Students Drown : रायगडच्या दिवेआगारमध्ये खूपच दुर्दैवी घटना घडली आहे. सहलीला आलेल्या एकूण 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व विद्यार्थी इयत्ता 11 आणि 12 वी इयत्तेत शिकणारे होते. हे विद्यार्थी समुद्राचा आनंद लुटण्यासाठी आले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत.
दुर्घटने नेमकी कशी घडली?
समोर आलेल्या माहितीनुसार आळंदीतील विनर्स अकादमीचे तब्बल 42 विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगारला गेले होते. यामध्ये 25 मुलं आणि 17 मुलींचा समावेश होता. दुपारच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, मात्र आठही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे काय?
या दुर्घटनेत राजवीर वहिले, सोहम भांडवलकर, कौस्तुभ दौंड, यश वानखेडे, कैवल्य वासंकर, तन्मय वहिले, सुमित अहिरे आणि प्रणव बनसोडे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. सहलीसाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने आळंदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
दुर्गघटना ही अत्यंत दुर्दैवी, कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत
ही घटना घडल्यानंतर रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या आणि मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी घटनेची माहिती दिली. ही घटना घडल्यानंतर मी तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. या दुर्घटनेत बचावलेल्या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार करा, असे निर्देश मी दिले आहेत. बाहेरून सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. तेथील रेस्क्यू टीम सहलीला आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत असते. परंतु घडलेली दुर्गघटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, असा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच आम्ही मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
