रायगडच्या दिवेआगारमध्ये मोठी दुर्घटना, समु्द्रात आठ विद्यार्थी बुडाले
मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या दिवेआगारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेले आठ विद्यार्थी समुद्रात बुडाले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे सर्व विद्यार्थी आळंदीवरून सहलीसाठी दिवेआगार येथे आले होते.

मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या दिवेआगारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेले आठ विद्यार्थी समुद्रात बुडाले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे सर्व विद्यार्थी आळंदीवरून सहलीसाठी दिवेआगार येथे आले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी समुद्रात बुडाले आहेत. या आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, ते सर्व विद्यार्थी आळंदीच्या विनर्स अकॅडमी क्लासचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व विद्यार्थी आकरावी आणि बारावीमध्ये शिकत होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आळंदीच्या विनर्स अकॅडमी क्लासची ही सहल होती. एकूण 42 विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले होते. हे सर्व विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. यातील आठ विद्यार्थी हे पोहोण्यासाठी समुद्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडाले. या सर्व विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
आदिती तटकरेंनी काय सांगितलं?
लोकल रेस्क्यू टीमशी मी संपर्क साधला. अनेकदा बाहेरून विद्यार्थ्यांची सहल येते. त्यावेळी स्थानिक टीम, रेस्क्यू टीम वॉर्निंग देत असतात. बाहेरून आलेल्या पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज नसतो. आता या घटनेत नेमकं काय झालं, याचा तपशील मिळालेला नाही. बाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह नेण्यात आलेले आहेत. शिक्षकांसोबतही संपर्क साधण्याचा माझा प्रयत्न आहे. स्थानिक प्रशासनही तिथे आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. ही स्थिती लक्षात घेऊन सहल आयोजित करणं अपेक्षित असतं. आम्ही विद्यार्थ्यांच्याही संपर्कात आहोत. बचावलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्याच्या आम्ही सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
