#Hruteek | ‘दिल मिल गये….’, पार पडला ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचा साखरपुडा, पाहा फोटो!

हृताने आणि प्रतीकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी आता अधिकृत जाहीर केले आहे, की ते दोघे आता प्रेमाच्या नात्यात आणखी एक पाऊल पुढे गेले आहेत.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 25, 2021 | 11:11 AM
1 / 5
‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमध्ये दीपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आणि तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. नुकताच हृता दुर्गुळेचा साखरपुडा पार पडला आहे.

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमध्ये दीपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आणि तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. नुकताच हृता दुर्गुळेचा साखरपुडा पार पडला आहे.

2 / 5

हृताने आणि प्रतीकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी आता अधिकृत जाहीर केले आहे, की ते दोघे आता प्रेमाच्या नात्यात आणखी एक पाऊल पुढे गेले आहेत. प्रतीक आणि हृताच्या साखरपुड्याचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

3 / 5

प्रतीक हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने यापूर्वी ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारखे हिट टेलिव्हिजन शो दिग्दर्शित केले आहेत. हृताप्रमाणेच प्रतीकनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हेच फोटो पोस्ट करून त्यांच्या साखरपुड्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केले आहे. हृताच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

4 / 5

मास कम्युनिकेशनची पदवी घेतलेल्या हृता दुर्गुळेने 'दुर्वा' या टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले. नंतर तिने 'फुलपाखरू' मालिकेत काम केले. सध्या ती अजिंक्य राऊतसोबत 'मन उडु उडु झालं' या शोमध्ये काम करत आहे.

5 / 5

या शोने पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. हृता आणि अजिंक्यची जोडी प्रेक्षकांसाठी खूप खास आहे. या शोमध्ये हृताने दीपालीची भूमिका साकारली आहे, जी अतिशय तत्त्वनिष्ठ स्त्री आहे. तिचे आयुष्य जगत असताना, तिची भेट इंद्राशी होते, जो तिचे आयुष्य बदलून टाकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us