Hruta Durgule | लाखो दिलों की धडकन… ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळे पडलीये प्रेमात, कोण आहे ‘हा’ खास व्यक्ती?

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमध्ये दीपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आणि तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 22, 2021 | 12:15 PM
1 / 5
‘मन उडु उडु झालं’ या मालिकेमध्ये दीपालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते आणि तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

2 / 5

पोस्टमध्ये हृताने स्वतःचा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाहचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने जाहीर केले की, ती आणि प्रतीक रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रतीक आणि हृताचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

3 / 5

प्रतीक हे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. प्रतीकने यापूर्वी ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदणी’ यासारखे हिट टेलिव्हिजन शो दिग्दर्शित केले आहेत. हृताप्रमाणेच प्रतीकनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हाच फोटो पोस्ट करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे. हृताच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

4 / 5

मास कम्युनिकेशनची पदवी घेतलेल्या हृता दुर्गुळेने 'दुर्वा' या टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले. नंतर तिने 'फुलपाखरू' मालिकेत काम केले. सध्या ती अजिंक्य राऊतसोबत 'मन उडु उडु झालं' या शोमध्ये काम करत आहे.

5 / 5

या शोने पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. हृता आणि अजिंक्यची जोडी प्रेक्षकांसाठी खूप खास आहे. या शोमध्ये हृताने दीपालीची भूमिका साकारली आहे, जी अतिशय तत्त्वनिष्ठ स्त्री आहे. तिचे आयुष्य जगत असताना, तिची भेट इंद्राशी होते, जो तिचे आयुष्य बदलून टाकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us