Pooja Sawant : पुन्हा फुलणार प्रेमाचं नातं, ‘भेटली ती पुन्हा 2’च्या निमित्तानं पूजा सावंत आणि वैभव तत्ववादीचं खास फोटोशूट

सध्या वैभव आणि पूजाच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दाखवली आहे. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Pooja Sawant and Vaibhav Tatwawadi's special photoshoot on the occasion of 'Bhetali Te Punha 2')

1/6
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानं आता चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. तर ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचा ‘भेटली ती पुन्हा 2’ हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

2/6
त्यामुळे वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) ही सुंदर जोडी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे.

3/6
याच निमित्तानं दोघांनी सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4/6
अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा सुंदर अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, ‘हरवू जरा….’, ‘जानू जानू….’ अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेलची घोषणा झाल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5/6
त्यामुळे आता या चित्रपटाच्या कथेनं काय नवं वळण घेतलं आहे, यात अजून काय नवीन बघायला मिळणार आहे किंवा कोणती गाणी असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

6/6
सध्या वैभव आणि पूजाच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दाखवली आहे. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI