
इतक्या महिन्यांच्या ब्रेकनंतर आता अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. त्यातच आता आणखी एका बिग बॅनर चित्रपटाची भर पडली आहे.

त्यात आता 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग 'तमाशा लाईव्ह'चे निर्माते आहेत.

पोस्टरवरुन हा चित्रपट संगीतावर आधारित असल्याचा भास होतोय. मात्र या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, यासाठी 2022 च्या दिवाळी पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

सध्या हे पोस्टर आपल्या भेटीला आलं असून सोशल मीडियावर आता या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.