
बॉलिवूड स्टार्ससारखे दिसणारे अनेक लोक असतात. काहींमध्ये बरंच साम्य असतं. अभिषेक बच्चन आणि प्रियांशु चटर्जी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

अभिषेक बच्चन आणि प्रियांशु चटर्जीचे चेहरे अगदी सारखेच दिसतात. जर तुम्ही या दोघांकडे बघितलं तर तुम्हीही गोंधळात पडाल.

प्रियांशु चटर्जीनं ‘तुम बिन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

प्रियांशु चटर्जी यांनी 'आपको पहले भी कभी देखा है', 'दिल का रिश्ता' यासारख्या हिट चित्रपटात काम केलं आहे. मात्र त्याला फार यश मिळालं नाही.

वर्ष 2020 मध्ये प्रियांशु चटर्जी शिकारा या चित्रपटात दिसला होता. तर आता अभिषेक बच्चनचा करिअरचा आलेख झपाट्यानं वाढत आहे. नुकतंच तो ‘बिग बुल’ या चित्रपटात दिसला होता आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.