
बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक जोडपी सध्या लग्नाच्या निमित्ताने चर्चेत आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफनंतर आता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अनेक वर्षांपासून एकत्र असलेले राजकुमार आणि पत्रलेखा आता दोघेही त्यांच्या नात्यात आणखी एक पाऊल पुढे टाकणार असल्याची बातमी येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राजकुमार आणि पत्रलेखा दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करू शकतात. दोघंही 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान लग्नगाठ बांधू शकतात.

लग्नाच्या 3 तारखा निघाल्या आहेत. मात्र, राजकुमार आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना लग्नाची माहिती दिल्याचे बोलले जात आहे.

असे देखील बोलले जात आहे की दोघंही डेस्टिनेशन वेडिंग सोडून खाजगीरित्या लग्न करतील ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होतील.

आतापर्यंत राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांकडून याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. पण चाहते आता दोघांच्या या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.