
रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट 8 मार्च रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई केलीये. या चित्रपटाला आता रिलीज होऊन तब्बल 15 दिवस होऊन गेले आहेत.

रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या अगोदर कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी हे चित्रपट फ्लाॅप झाले. मात्र, त्यानंतर रिलीज झालेला तू झूठी मैं मक्कार चित्रपट धमाका करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे रिलीजच्या पंधराव्या दिवशी चित्रपटाने चांगली कामगिरी केलीये. चित्रपटाचे आता एकून बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे 117.29 कोटी झाले आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर कपूर दिसला.

रणवीर कपूर हा तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे प्रमोशन करताना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला होता. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणवीर कपूर याने आलिया आणि त्याची मुलगी राहा हिच्याबद्दल सांगितले.

रणबीर कपूर म्हणाला होता की, आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काश्मीर येथे गेली असून तिच्यासोबत मुलगी राहा देखील गेलीये. आलिया आणि राहा यांना मी मिस करत आहे.