
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. चाहत्यांपासून बॉलिवूड सेलेब्सपर्यंत सगळेच या फोटोंवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

अभिनेता रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जे त्यांच्या कपड्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात.

आता रणवीर सिंह आपल्या अनोख्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. रणवीरनं बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या हटके स्टाईलमध्ये फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माय लव्ह अलेसँड्रो.'

रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. रणवीरचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंत आहेत. फोटोमध्ये रणवीर सिंह स्काय ब्लू कलरचा ट्रॅकसूट परिधान केलाय आणि काळ्या रंगाचा लेदर हँडबॅग कॅरी केलेला दिसत आहे. रणवीर सिंगचे सर्व फोटो त्याच्या बाकी फोटोंपेक्षा खूप वेगळी आहेत, कारण यात त्याचं सोन्याचे दागिने आणि लांब केसांची विग लावली आहे.