
महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख... या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडते. या दोघांच्या लग्नातील फोटो तुम्ही पाहिले आहेत का?

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी 2012 ला लग्नगाठ बांधली. एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जिनिलिया आणि रितेशची ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री झाली. नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा यांचा मुलगा.... 'तुझे मेरी कसम' या रितेशच्या पहिल्याच सिनेमात रितेश आणि जिनिलियाने एकत्र काम केलं होतं. तिथं या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली.

रितेश आणि जिनिलिया हे जोडपं अनेकांना आवडतं. त्यांची केमेस्ट्री भन्नाट आहे. या दोघांचं नातं खास आहे. याच महाराष्ट्राच्या फेव्हरेट जोडीच्या लग्नातील हा खास फोटो...

रितेश आणि जिनिलिया या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र मराठी सिनेमा केला. वेड हा त्यांचा पहिला एकत्र केलेला मराठी सिनेमा होता. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.