AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वी पास विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार, तब्बल 21 हजार पदांची मेगाभरती, अर्ज कसा करावा?

रेल्वे भरती मंडळाने २१,९९७ ग्रुप डी पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. १० वी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२६ आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे वाचा.

10 वी पास विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार, तब्बल 21 हजार पदांची मेगाभरती, अर्ज कसा करावा?
indian railway
| Updated on: Feb 02, 2026 | 4:15 PM
Share

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने ग्रुप डी (लेव्हल १) मधील रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या महाभरतीद्वारे तब्बल २१ हजार ९९७ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची एक संधी मिळणार आहे. या मेगाभरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

महत्त्वाच्या तारखांचे वेळापत्रक

उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान खालील तारखा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • अर्ज प्रक्रिया सुरू: ३१ जानेवारी २०२६
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: २ मार्च २०२६
  • ऑनलाईन फी भरण्याची मुदत: ४ मार्च २०२६
  • सुधारणा खिडकी (Correction Window): अर्ज भरताना चूक झाल्यास दुरुस्तीसाठी ठराविक वेळ दिली जाईल.

पात्रता आणि वयोमर्यादा

यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. तसेच ज्यांनी NCVT कडून ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र’ (NAC) किंवा ITI पूर्ण केले आहे, ते देखील या पदांसाठी पात्र आहेत. यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे असणे गरजेचे असणार आहे. सरकारी नियमांनुसार, ओबीसी (OBC) उमेदवारांना ३ वर्षे, तर एससी/एसटी (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षांची सवलत मिळेल.

रेल्वेने या भरतीसाठी पारदर्शक फी पद्धत ठेवली आहे, ज्यामध्ये परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना ठराविक रक्कम परत मिळणार आहे. जर तुम्ही खुला आणि ओबीसी प्रवर्गात असाल तर तुम्हाला ५०० रुपये फी भरावी लागेल. परीक्षा दिल्यानंतर ४०० रुपये परत मिळतील. तर SC/ST/महिला/दिव्यांग/माजी सैनिक यांना २५० रुपये फी भरायची असून परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण २५० रुपये परत मिळतील. फी परत मिळवण्यासाठी उमेदवारांनी अर्जात स्वतःचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड अचूक भरणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार?

ही भरती प्रक्रिया एकूण चार टप्प्यांत पूर्ण होईल

  • संगणक आधारित चाचणी (CBT): ही पहिली पायरी असून यात सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडींवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील.
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PET): लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना मैदानी चाचणी द्यावी लागेल, ज्यात ठराविक वजन उचलून चालणे आणि धावणे समाविष्ट आहे.
  • कागदपत्र पडताळणी: पात्र उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक आणि वयाच्या पुराव्यांची तपासणी केली जाईल.
  • वैद्यकीय तपासणी (Medical Test): रेल्वेच्या मानकांनुसार शारीरिक आणि दृष्टीच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाईट्सवर (उदा. RRB Mumbai, RRB Pune) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना नवीन पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी आणि १० वीचे मार्कशीट स्कॅन करून तयार ठेवावे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.