AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 120 जागांची मेगाभरती, पगार किती? अर्ज कसा करता येणार?

येत्या ५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत! यासाठी एकूण किती रिक्त पदे आणि आकर्षक वेतन श्रेणी काय? तुम्ही पात्र आहात का? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 120 जागांची मेगाभरती, पगार किती? अर्ज कसा करता येणार?
government jobs
| Updated on: Feb 01, 2026 | 3:40 PM
Share

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Senior Executive Trainee) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. बीएसएनएलच्या एकूण १२० रिक्त जागांसाठी ही प्रक्रिया राबवली आहे. यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

बीएसएनएलच्या उमेदवारांनी खालील तारखांची नोंद घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तांत्रिक अडथळे टाळता येतील.

  • ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रारंभ: ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १०:०० वा.)
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: ७ मार्च २०२६ (सकाळी १०:०० वा.)
  • अर्ज दुरुस्ती: ८ मार्च ते १५ मार्च २०२६
  • प्रवेशपत्र उपलब्धता: मार्च २०२६ चा शेवटचा आठवडा (अपेक्षित)
  • ऑनलाईन परीक्षा (CBT): एप्रिल २०२६

किती पदं रिक्त?

या भरती मोहिमेद्वारे एकूण १२० पदे भरली जाणार आहेत. यातील इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी टेलिकॉम स्ट्रीम (Technical) ४० पदांची भरती केली जाणार आहे. तर CA/CMA साठी फायनान्स स्ट्रीम (Non-Technical) साठी ११ पदांची भरती केली जाणार आहे. यातील उर्वरित ६९ पदे SC, ST, OBC, EWS आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार राखीव ठेवण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

BSNL मधील वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी टेलिकॉम विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यांपैकी एका शाखेतून BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये जनरल आणि OBC प्रवर्गासाठी किमान ६० टक्के तर SC/ST उमेदवारांसाठी ५५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

वित्त विभागासाठी उमेदवाराने CA किंवा CMA पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादेचा विचार करता, १ जानेवारी २०२६ रोजी खुल्या आणि EWS प्रवर्गासाठी कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सरकारी नियमांनुसार OBC (NCL) उमेदवारांना ३३ वर्षांपर्यंत (३ वर्षे सवलत), SC/ST उमेदवारांना ३५ वर्षांपर्यंत (५ वर्षे सवलत) आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांपर्यंतची अतिरिक्त सवलत लागू असेल.

पगार किती?

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती E-3 इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स (IDA) वेतन श्रेणीत केली जाईल. यामध्ये २४,९०० ते ५०,५०० या मूळ वेतन श्रेणीसह (Basic Pay) महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय विमा, रजा प्रवास सवलत (LTC) आणि कार्यक्षमता आधारित विशेष भत्ते (Perks) दिले जातील. एकूणच केंद्र सरकारी मानकांनुसार हे एक अत्यंत आकर्षक वेतन पॅकेज असणार आहे.

निवड प्रक्रिया कशी होईल?

  • BSNL मधील ही निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि तीन टप्प्यांत पार पडेल.
  • ऑनलाईन परीक्षा (CBT): यामध्ये तांत्रिक विषय आणि जनरल एबिलिटी (Aptitude, Reasoning) असे दोन भाग असतील.
  • गुणवत्ता यादी: या परीक्षेतील गुणांच्या आधारे विभागनिहाय मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणी: अंतिम निवडीपूर्वी मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ