AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षा नाही, मुलाखत नाही, फक्त मार्कशीटवर मिळणार नोकरी; इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती, कसा कराल अर्ज?

महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यांत IOCL पाईपलाईन विभागात तांत्रिक आणि बिगर तांत्रिक पदांची भरती. १८ ते २४ वयोगटातील १२ वी पास आणि पदवीधर तरुण पात्र. प्रशिक्षणादरम्यान मिळणार आकर्षक विद्यावेतन; पूर्ण माहिती वाचा.

परीक्षा नाही, मुलाखत नाही, फक्त मार्कशीटवर मिळणार नोकरी; इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती, कसा कराल अर्ज?
Indian Oil Recruitment
| Updated on: Jan 27, 2026 | 3:52 PM
Share

पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन ऑईलच्या पाईपलाइन विभागात २०२६ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentice) एकूण ३९४ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. यावेळी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या गुणवत्तेवर (Merit Basis) केली जाणार आहे.

इंडियन ऑईलच्या पाईपलाइन विभागात असलेली ही भरती देशातील विविध विभागांतर्गत केली जात आहे. ही भरती इंडियन ऑइलच्या पाइपलाइन्स विभागांतर्गत पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा चारही विभागांत केली जात आहे. यामध्ये पश्चिम विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून, त्याखालोखाल पूर्व, उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये एकूण ३९४ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश पश्चिम विभाग पाईपलाईन्स (WRPL) मध्ये करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर या तीन ठिकाणी एकूण १२ शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार जाईल. तर संपूर्ण पश्चिम विभागात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचा या ठिकाणी एकूण १३६ जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत तांत्रिक आणि बिगर तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे

विविध पदे आणि शैक्षणिक पात्रता

  • टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि इन्स्ट्रुमेंटेशन): संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा.
  • ट्रेड अप्रेंटिस (असिस्टंट-HR): कोणत्याही विषयातील पूर्णवेळ पदवी (Graduation).
  • ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट): वाणिज्य शाखेतील (B.Com) पदवी.
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher/Skill Certificate): किमान १२ वी उत्तीर्ण, परंतु पदवीधर नसावा.

वयोमर्यादा आणि अटी

या अर्जदाराचे वय ३१ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची वयात सवलत दिली जाईल. सर्व उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.

जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्रथम ट्रेडनुसार NATS (https://nats.education.gov.in/) किंवा NAPS (https://www.apprenticeshipindia.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन ऑइलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: २८ जानेवारी २०२६.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० फेब्रुवारी २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत).
  • अधिकृत वेबसाइट: https://plapps.indianoilpipelines.in/

निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान नियमानुसार मासिक विद्यावेतन (Stipend) देखील दिले जाणार आहे.

छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.