AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्लील फोटो-व्हिडीओ, 5 कोटींची मागणी! अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय, तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी थेट…

सध्या सगळीकडे कॅप्टन अशोक खरात यांची चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत खरातांपुढे माथा टेकत होते. आता त्यांच्या विरोधात तीन नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अश्लील फोटो-व्हिडीओ, 5 कोटींची मागणी! अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय, तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी थेट...
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 19, 2026 | 1:08 PM
Share

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरात यांच्यावर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडले. आता या प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले असून, या पथकाच्या प्रमुखपदी महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी तीन गुन्हे दाखल

राज्य गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, अशोक खरात यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास आता SIT एकत्रितपणे करणार आहे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. अशोक खरात यांच्याविरुद्ध नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीनही गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमे लागू करण्यात आली असल्याने राज्य पोलिस मुख्यालयाने SIT गठित करण्याचा निर्णय घेतला. सर्व संबंधित कागदपत्रे, केस डायरी आणि उपलब्ध पुरावे तात्काळ SIT कडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा नियमित अहवाल महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. SIT च्या प्रमुखपदी नियुक्त झालेल्या तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमधील ५८ व्हिडिओ, इतर संभाव्य पीडित महिला, ट्रस्टशी संबंधित व्यवहार आणि राजकीय-धार्मिक संबंध यांचा सखोल तपास करणार आहे.

या निर्णयामुळे कॅप्टन अशोक खरात प्रकरणात लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता वाढली आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेले अशोक खरात हे मर्चंट नेव्हीतून निवृत्त अधिकारी आहेत. ते अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट म्हणून ओळखले जात होते. सध्या अशोक खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SIT च्या तपासात आणखी किती महिलांचे शोषण समोर येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी