
गायिका नेहा कक्करनं बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा नवरा रोहनप्रीतही नेहासोबत दिसला आहे. नेहाच्या आईचा वाढदिवस असल्यानं हे खास फोटोशूट करण्यात आलं. सोबतच हे फोटो शेअर करत नेहा आणि रोहनप्रीतनं आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती रोहनप्रीतबरोबर खूप खुश दिसत आहे. नेहा आणि रोहनप्रीतनं एकत्र खूप रोमँटिक पोज दिल्या आहेत.

या फोटोंवर नेहा कक्करचे चाहते तिला विचारत आहेत की, गोड बातमी कधी देणार आहात.

आता तुम्ही असा विचार करत असाल की चाहते कोणत्या चांगल्या बातमीबद्दल विचारत असतील? तर गेले अनेक दिवसांपासून ही बातमी व्हायरल होत आहे की नेहा कक्कर गर्भवती आहे.

एवढंच नाही तर नेहा कक्कर इंडियन आयडल 12 शोमध्ये न दिसण्याचं कारणही हेच मानलं जात आहे. मात्र, नेहा किंवा रोहनप्रीत यांच्यासारख्या अधिकृतपणे याबद्दल माहिती मिळालेली नाही.