AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup : Icc चा बांगलादेशला दणका, या टीमची वर्ल्ड कपमध्ये अचानक एन्ट्री! किती सामने जिंकलेत?

Bangladesh Icc T20i World Cup 2026 : आयसीसीने बांगलादेशची त्रयस्थ ठिकाणी वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने आयोजित करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे आता बांगलादेशच्या जागी दुसऱ्या संघाला संधी देण्यात येणार असल्याचं निश्चित समजलं जातंय. जाणून घ्या.

T20I World Cup : Icc चा बांगलादेशला दणका, या टीमची वर्ल्ड कपमध्ये अचानक एन्ट्री! किती सामने जिंकलेत?
Icc T20i World Cup 2026Image Credit source: Icc
| Updated on: Jan 22, 2026 | 7:25 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने बीसीसीआयच्या आदेशानंतर त्यांच्या टीममधील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला रिलीज केलं. बांगलादेशमधील हिंसाचारानंतर बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजूरला रिलीज करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केकेआरने मुस्तफिजूरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हापासून बांगलादेशला क्रिकेट बोर्डाला भारतात खेळणं अचानक असुरक्षित वाटायला लागलं. याच असुरक्षितेतचा बहाणा सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास नकार दिलाय. बीसीबीने आयसीसीकडे त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात यावे, अशी विनंती केली होती. मात्र आयसीसीने बीसीबीची ही विनंती फेटाळून लावलीय. त्यानंतर बांगलादेशनेही भारतात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यावर बहिष्कारण घातला आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. बांगलादेशच्या जागी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एका संघाला संधी मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. स्कॉटलँडला संधी मिळाल्यास त्यांची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही सलग पाचवी वेळ ठरेल.

स्कॉटलँड युरोपियन क्वालिफायर स्पर्धेतून वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली होती. स्कॉटलँड त्या स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिली होती. मात्र आता स्कॉटलँडचं अचानक नशीब फळफळणार असल्याचं समीकरण पाहायला मिळत आहे. स्कॉटलँडला याआधी 2009 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची अचानक संधी मिळाली होती. युकेकडे 2009 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान होता. मात्र युके आणि झिंबाब्वे यांच्यात राजकीय संघर्ष होते. त्यामुळे झिंबाब्वेने राजकीय संघर्षामुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता.

स्कॉटलँडची टी 20i वर्ल्ड कपमधील कामगिरी

स्कॉटलँडला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत काही खास करता आलेलं नाही. स्कॉटलँडने 6 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 22 सामने खेळले आहेत. स्कॉटलँडला त्यापैकी फक्त 7 सामने जिंकता आले आहेत. तर प्रतिस्पर्धी संघांनी स्कॉटलँडला 13 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे.

स्कॉटलँडने एकूण किती टी 20i सामने जिंकलेत?

दरम्यान स्कॉटलँडने आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात एकूण 109 सामने खेळले आहेत. त्यापैकी स्कॉटलँडने 49 सामने जिंकले आहेत. तर स्कॉटलँडचा 55 सामन्यांमध्ये पराभव झालाय. तर 1 सामना हा टाय झालाय. तर स्कॉटलँडच्या 4 सामन्यांचा निकाल लागला नाही.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.