
शेरडं- करडं, असं म्हणत अभिनेता तानाजी गळगुंडेने हे फोटो शेअर केलेत. त्याचा या फोटोंना नेटकऱ्यांनी त्याच्या फोटोंना पसंती दिली आहे. अनेकांनी कमेंट करत तानाजीचं कौतुक केलं आहे.

मस्तच भावा! शेरडं- करडं राखायला पण नशिबवानच लागतं यार...!, असं म्हणत एका चाहत्याने तानाजीच्या फोटोवर कमेंट केली आहे. लय भारी वाटत आता गावाकडचं रहाणीमान बघून, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

एवढी सुपरडूपर हिट सिनेमा करून देऊन सुद्धा मित्रा तुझं राहणीमान किती साधं आहे रे... झेप आकाशी घेऊन पाय अजून जमिनीवरच असा आहेस तू..., असं म्हणत नेटकऱ्यांनी तानाजीचं कौतुक केलंय.

लहान असताना खेड्यात असाच शेळ्या घेवून वावरताना, मनात शहराची ओढ असते. पण जेव्हा गाव सोडत ना तेव्हा गावाकडच्या आठवणी मनाला भारावून टाकतात . मग मनाला वाटू लागतं, काय दिवस होते यार ..... खरंच, असं म्हणत एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हेच जगणं, वावरणे, शांती अनुभवने.... याच्या पुढे स्वर्ग सुधा फिका पडेल असे अप्रतिम सौंदर्य, आणि आठवणी. तानाजी भाऊ खरच तुझ्या सर्वच पोस्ट खूप छान असतात, असं तानाजीच्या एका चाहत्याने म्हटलंय.