
आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असते. आता सावनीनं शेअर केलेले हे सुंदर फोटों सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

नुकतंच काही दिवसांपूर्वी सावनीला कन्या रत्न प्राप्त झाला. आपल्या लाडक्या लेकीचं नाव सावनीनं ‘शार्वी’ असं ठेवलं आहे.

गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात 6 ऑगस्टला शार्वीचं आगमन झालं. आता शार्वी एक महिन्याची झाल्यानं तिचं सुंदर फोटोशूट करण्यात आलं आहे.

सावनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या या फोटोशूटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

गरोदरपणाची बातमी देताना सावनीनं माध्यमाला सांगितलं होतं की, ‘माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली आहेत. तर काही गाणी लवकरच रिलीज होणार आहेत. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणाऱ्या बाळानं मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही.’