
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज तुरुंगातून बाहेर आला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनची तब्बल तीन आठवड्यांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे.

आर्यनला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. आर्यन तुरुंगातून बाहेर आल्याचे फोटो आता समोर आले आहेत. ज्यामध्ये तो तुरुंगातून बाहेर येताच अंगरक्षकांनी त्याला मागचा दरवाजा उघडून रेंज रोव्हर कारमध्ये बसवले.

आर्यन आता मन्नतला पोहोचला आहे. शाहरुख खान आणि गौरी खान आपल्या मुलाला घेण्यासाठी तुरुंगात गेले होते. कारमध्ये आर्यनसोबत मागच्या सीटवर कोण बसलेलं आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधून आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता.

आर्यनला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला तेव्हापासून चाहते मन्नतच्या बाहेर सेलिब्रेशन करत आहेत.