
आपण बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलला गोंडस आणि खट्याळ अंदाजात पाहिलं आहे. मात्र, बिग बॉस या टीव्ही शोमधून बाहेर आल्यानंतर शहनाजनं स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. फक्त तिचे वजन कमी झाले नाही, तर ती ग्लॅमरस अवतारात दिसतेय.

शहनाज गिलनं नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने अतिशय एक्सपोजिंग ड्रेस परिधान केला होता आणि ती सुंदर लुक देताना दिसत आहे.

बिग बॉसचा भाग झाल्यानंतर पंजाबी चित्रपट अभिनेत्री शहनाज गिलला राष्ट्रीय लोकप्रियता मिळाली. फोटोंमधील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भुरळ पाडत आहे.

शहनाज गिलचे हे फोटो काही वेळातच लाखो लोकांनी लाईक केले आहेत आणि शेअर केले आहेत. हे फोटो फॅन पेजवरही खूप व्हायरल होत आहेत.

शहनाज गिल बिग बॉस 13 चा विजेता होऊ शकली नाही. तरी या शोमध्ये तिनं प्रेक्षकांचं मने जिंकली.

या शो दरम्यान तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्रीदेखील चांगलीच गाजली होती. या दोघांबद्दल अनेक बातम्या समोर आल्या.

बिग बॉस 13 मधील शो दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाज बर्याच वेळा खूप जवळ दिसले. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनाही हटके प्रोजेक्ट्स मिळाले आहेत.