
टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते. आज अभिनेत्रीचा पती जेम्स मिलिरॉन त्याचा वाढदिवस साजरा करत आहे शमा सिकंदरने जेम्स मिलिरॉनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर शमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पती जेम्स मिलिरॉनसोबत समुद्राजवळ रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. यावेळी शमा सिकंदरने काळ्या ब्रॅलेट टॉप आणि शॉर्ट्स अश्या बोल्ड लूकमध्ये दिसत आहे, तर जेम्स मिलिरॉनही पांढऱ्या आणि स्काय कलरच्या शेडेड शर्टमध्ये दिसून येत आहे.

फोटो बरोबरच शमा सिकंदरने खास पोस्ट लिहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय जेम्स, तू खूप छान व्यक्ती आहेस, तुला जे काही हवं आहे ते तुला मिळते, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस."

शमा सिकंदर आणि तिचा नवरा जेम्स मिलिरॉन यांच्या फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येतआहेत. अनेकांनी कमेंट करत कौतुक केले आहे. एका चाहत्याने 'व्वा किती सुंदर क्षण आहे' . तर दुसर्याने लिहिले आहे की ' खूप सुंदर जोडपे' इतरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

शमा सिकंदरने मार्च 2022 मध्ये बिझनेसमन जेम्स मिलिरॉनशी लग्न केले आहे. शमा ये मेरी लाईफ है , बालवीर , सात अश्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.