
अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत असताना शहनाज एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा आहे.

गुलाबी रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये शहनाज प्रचंड सुंदर दिसत आहे. अभिनेत्री कायम तिच्या परफेक्ट फिगरमुळे चर्चेत असते. बिग बॉसमुळे शहनाज हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

शहनाज हिने तिच्या करियरची सुरुवात २०१७ पासून केली. शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’ या पंजाबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर शहनाजने कधीही मागे वळून पाहिलं नाही. शहनाज एक उत्तम गायक देखील आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी ओळख तयार करत आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.