
बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचे नशीब उजळले असून चक्क साऊथच्या बिग बजेट चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये.

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही जान्हवी कपूर ही दिसली होती. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. काही जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया या डेट करत असल्याची चर्चा असून अनेकदा हे दोघेसोबतच स्पाॅट देखील होतात.

काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे स्पाॅट झाले होते. मात्र, अजूही जान्हवी किंवा शिखर यांनी त्यांच्या नात्याबद्दल काही भाष्य केले नाहीये.

नुकताच जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जान्हवीच्या या फोटोवर कमेंट करण्यापासून शिखर पहाडिया हा स्वत: ला रोखू शकला नाही. शिखर पहाडिया हार्ट इमोजी हे जान्हवीच्या फोटोवर शेअर केले आहेत.