
झी मराठी वाहिनीवरच्या 'शिवा' या मालिकेतील आशू म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर... अभिनेता शाल्व किंजवडेकर हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

शाल्व किंजवडेकर याची खऱ्या आयुष्यातील जोडीदार खूपच सुंदर दिसते. स्टायलिस्ट श्रेया डफळापूरकर हिच्यासोबत शाल्व लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

श्रेया डफळापूरकर कॉस्ट्युम डिझायनर आहे. 'स्टाईल बाय श्रेया' हा तिचा कपड्यांचा ब्रँड आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसाठी कॉस्ट्युम डिझायन केला आहे. पुढच्या महिन्यात शाल्व आणि श्रेया लग्नगाठ बांधणार आहेत.

14 फेब्रुवारी 2023 ला या दोघांचा साखरपुडा झाला. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता हे दोघे लग्न करणार आहेत. या दोघांच्या जोडी त्यांच्या चाहत्यांना आवडते.

शिवा मालिकेत आशू ही भूमिका शाल्वने साकारली होती. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या झी मराठीवरच्या मालिकेतील ओम ही त्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या शिवाय बकेट लिस्ट या सिनेमातही त्याने काम केलंय.