
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा नेहमीच चर्चेत असतो. दिलजीत दोसांझ यांच्या अभिनयाला देखील चाहत्याचे प्रचंड प्रेम मिळते. अत्यंत कमी कालावधीमध्ये खास ओळख ही दिलजीत दोसांझ याने मिळवली आहे.

दिलजीत दोसांझ हा करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही मोठी संपत्ती ही दिलजीत दोसांझ याची आहे. पंजाब, मुंबई आणि कॅलिफोर्नियामध्ये दिलजीत दोसांझ याचे आलिशान घरे आहेत.

एका रिपोर्टनुसार दिलजीत दोसांझ याचे नेट वर्थ 165 कोटींचे आहे. मुंबई आणि लुधियानामध्येही मोठी संपत्ती ही दिलजीत दोसांझ याची आहे. मुंबईमधील घराची किंमत 10 कोटींची आहे.

अत्यंत आलिशान कारचे कलेक्शन देखील दिलजीत दोसांझ याच्याकडे आहे. Porsche Cayenne आणि Porsche Panamera या सारख्या आलिशान गाड्या या दिलजीत दोसांझ याच्याकडे आहेत.

दिलजीत दोसांझ याने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दिलजीत दोसांझ याने गाण्यांसोबतच चित्रपटांमधून तगडी कमाई केलीये.