
सलमान खान याची लाडकी बहीण अर्पिता हिने मुंबईमध्ये ईदनिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक स्टारने उपस्थिती लावली होती. आता या पार्टीतील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोहेल खान या पार्टीमध्ये कॅज्युअल आउटफिटमध्ये पोहचला होता. मात्र, यावेळी सोहेल खान याच्या हातामध्ये जिमची बॅग बघायला मिळाली. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

ईदच्या पार्टीमध्ये सोहेल खान हा जिमची बॅग घेऊन पोहचल्याने त्याला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी थेट जिमची बॅग पार्टीमध्ये घेऊन येण्याचे कारणही थेट विचारून टाकले.

एकाने कमेंट करत सोहेल खान याच्या फोटोवर लिहिले की, हा खूप जास्त नाटकी माणूस आहे. कोणी पार्टीला जिमची बॅग घेऊन येतो का? सोहेल खान याचा लूकही अनेकांना आवडलाय.

अर्पिताने आयोजित केलेल्या या पार्टीला अनेक बाॅलिवूड स्टारने हजेरी लावली. या पार्टीमध्ये खास लूकमध्ये कतरिना कैफ ही पोहचली होती. कतरिनाचा लूक अनेकांना आवडलाय.