
अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि तिचा प्रियकर आज रात्री विवाह बंधनात अडकत आहेत. यानंतर रिया आता स्पॉट झाली आहे. तिने लाल रंगाचा पोशाख घातला होता. मात्र, कारमध्ये बसल्यामुळे तिचा पूर्ण फोटो आला नाही.

करण देखील यावेळी सोबत दिसला. त्याने ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजामा आणि त्यासोबत लाल रंगाची चुनरी घातली होती.

सोनम कपूरसुद्धा आनंद आहुजासोबत विवाह सोहळ्यात पोहोचली. दोघे एकत्र खूप छान दिसत होते.

सोनमने मिंट कलरचा अनारकली सूट परिधान केला होता, तर आनंदने ग्रे कुर्ता पायजमा परिधान केला होता.

अनिल कपूर यांनी छायाचित्रकारांना मिठाई वाटली. या दरम्यान त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.