
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.

आता ‘देवमाणूस’ मालिकेची सक्सेस पार्टी दिमाखात पार पडली. या पार्टीचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी खास भेटवस्तू सुद्धा देण्यात आली. या अनोख्या भेटवस्तूचे फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

सोबतच मालिकेतील सर्वच कलाकारांनी एकदम हटके अंदाजात पार्टीला हजेरी लावली होती.

मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

मालिकेच्या शेवटला, चंदासोबत आगीत दुसरा मृतदेह कोणाचा होता? ही आग नेमकी कोणी लावली? डिम्पलने पैशांची बॅग कुठे ठेवली? डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं? डिम्पल रात्री कुठे पळून जाते? तिला देवीसिंगबद्दल माहित आहे का? देवीसिंग पुन्हा जिवंत कसा होतो? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे या मालिकेचा दुसरा सीझन येणार, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत.