
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सईनं नुकतंच ‘मिमी’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सई या चित्रपटात क्रिती सॅननच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे.

सईनं समांतर 2 मध्ये दुहेरी भूमिका साकारत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘मीमी’ चित्रपटानंतर तिचं सर्व स्थरावरुन कौतुक होताना दिसतंय. सई एक मुस्लिम महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासोबतच फॅशन आणि स्टाईलबाबतही तितकीच सजग आहे. हटके स्टाईल आणि फॅशनमध्ये ती स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतंच सईनं तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' या हिंदी चित्रपटात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे.तिचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.