
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र, त्यावेळी कागदपत्र पूर्ण न झाल्याने त्याला बाहेर येता आलं नाही. पण आता काल म्हणजेच शनिवारी तो मन्नतवर त्याच्या घरी परतला आहे.

मन्नतवर आर्यनच्या स्वागतासाठी संपूर्ण कुटुंब सज्ज झालं होतं. इतकंच नाही तर मन्नतलाही लाईट्सनी सजवण्यात आलं होतं.

आता आर्यन परतल्यानंतर बहीण सुहाना खानही त्याला भेटण्यासाठी दुबईहून भारतात परतणार आहे.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर सुहानाने आर्यनसोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आय लव्ह यू लिहिलं होतं. आर्यन आणि सुहाना एकमेकांच्या खूप जवळ आहेत.

आर्यन तुरुंगात गेल्यापासून सुहाना सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. तिलाही तिच्या भावाची खूप काळजी वाटत होती.