Photo : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील सासू-सूनेची आहे घट्ट मैत्री, अक्षया नाईकनं व्यक्त केल्या भावना

ऑनस्क्रीन सासू – सून नातं असलं तरीदेखील ते खूप सुंदर आहे आणि अगदीच तसेच ऑफस्क्रीन देखील त्यांचे नाते खूप छान आहे. ('Sundara Manamdhe Bharli' serial's cast have close friendship, feelings expressed by Akshaya Naik)

Jun 24, 2021 | 3:13 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 24, 2021 | 3:13 PM

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. यामधील काही पात्रांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील काही कालाकारांमध्ये खूप चांगले नाते तयार झाले आहे.

1 / 5
खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून हे बॉंडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळतं. मालिकेचे शूट करत असताना सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात.

2 / 5
तसंच काहीसं इंदूची भूमिका साकारणार्‍या अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यामध्ये झालं.

3 / 5
ऑनस्क्रीन सासू – सून नातं असलं तरीदेखील ते खूप सुंदर आहे आणि अगदीच तसेच ऑफस्क्रीन देखील त्यांचे नाते खूप छान आहे. इंदूसाररखी सासू, आई मिळावी आणि लतिका सारखी समजूतदार मुलगी, सून मिळावी असं सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातं.

4 / 5
अतिशा ताई आणि इंदू यामध्ये खूप साम्य आहे. खूप मायाळू आहे, मदतीसाठी नेहेमी तयार असते. माझ्या कामात देखील मला तिचं मार्गदर्शन मिळत असतं. कसं माझं काम अजून चांगलं होईल यासाठी नेहेमी मला ती मदत करते. तिच्याकडे सगळ्या अडचणींवर उपाय असतात. कुठल्याही गोष्टीला ती कधीच नाही म्हणत नाही. आम्ही सेटवर असो वा शूटिंग संपल्यावर खूप गप्पा मारतो, मला तिच्या रूपात चांगली मैत्रीण मिळाली असं मत अक्षया नाईकनं व्यक्त केलं आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें