
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सुरभी रोज तिच्या स्टाईलची जादू चाहत्यांवर दाखवतेय. सुरभीनं टीव्हीवर इश्कबाज मालिकेतून लोकप्रियता मिळवली, त्यानंतर ती अनेक लोकप्रिय शोचा भाग होती.

सुरभी सध्या मालदीवमध्ये धमाल करत आहे, त्यामुळे ती सुट्टीचा आनंद घेत ग्लॅमरस स्टाईलमध्ये फोटो शेअर करत आहे.

नुकतंच तिने तिचे गुलाबी ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो पाहून तिचे चाहते पुन्हा वेडे होत आहेत.

या फोटोंमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सुरभीने 2009 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा या कॉमेडी शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. आज ती छोट्या पडद्याची शायनिंग स्टार आहे.